फिरल्यास का कधी हिरव्यागार गवतात
भिजलायस का कधी मनसोक्त पावसात
बागडलायस का कधी फुलपाखराबरोबर
दुलालायास का कधी झाडांबरोबर
गायलायस का कधी पक्षांसंगे गाणी
वाहलायस का कधी होऊन झऱ्याच पाणी
हसलायास का कधी खळाळून एकदा
रडलायास का कधी लहान होऊन पुन्हांदा
चुकलायस का कधी रोजच्याच प्रवासात
हरवलायस का कधी कुणाच्या ह्रदयात
जाणवलय का तुला नव्यान कधी काही
झाली आहे का कधी शर्टाची ओली बाही
ओळखलयस का तू तुझ्या सखीला
बोललायस का कधी मनातले तू तिला
नशील बोलला तर बोलून बघ
तिच्यासंगे एकदा फिरून तर बघ
पावसामध्ये एकदा भिजून तरी बघ
झाडांसंगे एकदा दुलून मग बघ
पक्षांसंगे गाउन गोड गाणी
होऊन झऱ्याच नितळ पाणी
हास म तिच्याबरोबर खळाळून
रड मग तिच्या कुशीत जाऊन
एकदा तरी तिच्या मनात डोकावून बघ
रोजच्याच प्रवासात एकदा तरी चुकून बघ
नक्की सापडेल तुला नव्याने काही
अपोआप मिळतील उत्तर सारी काही
तेजश्री
No comments:
Post a Comment