दिवसा ढवळ्या आकाशात काळे ढग दाटून आले
त्याच्याशी मग जीवनाच गणित अपोआप जुळवले गेले
काळे ढग डोळ्यांसमोर बेभान होऊन नाचत होते
वाऱ्यासंगे धुंदीत ते दंगा मस्ती करत होते
इतक सगळ सहज घडल की प्रश्नाला जागाच नाही उरली
पण नियतीच्या निकाल बघून अस्वस्थतेची ठिणगी पडली
अख्खा दिवस समोर असताना दाटलेला हा काळोख
आरशात पाहून स्वतःचीच पटणार नाही ओळख
त्यातच मग एक गर्जना झाली
दाटलेल्या ढगातून जोरात वीज कडाडली
विजेची ती आरोळी ऐकली
अन काळजाचा ठोका चुकवून गेली
इतका भयाण दिवस एका माळरानावर एकटीने काढायचा तरी कसा?
ह्या दिवसाचा शेवट होईल कधी अन कसा?
किती ह्या इच्छा अन किती आकांक्षा
किती जबाबदार्या अन किती त्या अपेक्षा
फुल उमलायच्या आधीच कोमेजणार तर नाही
अपेक्षांचं ओझ झेलताना नाव तर डुबणार नाही
हे जीवन सुंदर आहे अस ठासणाऱ्याना प्रश्न नाही का पडत?
एवढ ओझ उचलताना कणा नाही का मोडत
समाजाच्या बंधनापुढे किती वेळा झुकायच
इतरांसाठी आपण किती दिवस झीजायाच
एक सकाळ तरी अशी येईल का?
सुखद धक्याने नाहून टाकेल का?
भयानक वातावरणातून कधी सुटका होणार
समाजाची बेदी कधी हातातून निघणार
नव्याने अपेक्षा करावीशी वाटते
देवाकडे एकच प्रार्थना मी करते
ह्या लोकांना थोडी बुद्धी तू दे
संयमात राहूनही मुक्त ह्यांना होऊ दे
- तेजश्री
No comments:
Post a Comment