Wednesday, September 29, 2010

लघुकथा

स्वप्नांच्या दुनियेतून आला एक कुमार
पांढऱ्या शुभ्र घोड्यावर होऊन स्वार 
हात घेऊन म माझा हाती 
घातली मग अंगुठी मधल्या बोटी 
म्हणला मग बसून दोन्ही गुडघ्यांवर 
खूपच फिदा आहे राणी मी तुझ्यावर 
मग मी ही ठरवलं मनाशी 
गंमतच करूयात ह्याच्याशी 
उठवून त्याला दोन्ही हातानी 
बांधली पट्टी दोन्ही नयनी 
फिरवले त्याला मग स्वतःभोवती 
शोधायला लावले मला मैत्रिणीनमधुनी  
अट अशी मी घातली होती 
पूर्ण करायला मिळेल एकमेव संधी 
स्पर्श करायचा नाही कुणालाच 
प्रश्न विचारायचा नाही कुठलाच 
मनात म्हटल मग आता 
निघून जाईल ह्याची हवा 
म्यानातली तलवार हातात घेऊन 
प्रत्येकीच्या गळ्याशी रुबाबात धरून 
घेतला होता अंदाज त्यानी 
एकेकीच्या निकटी जाउनी 
श्वासांच्या एकसंध लायीवरून 
ओळखले त्याने एकीला शपथेवरून 
विचारले जेव्हा मग मी त्याला 
करशील विवाह तिच्याशी, ओळखलेस तू जिला ? 
आत्मविश्वासाने हो जेव्हा तो म्हणाला 
त्याक्षणीच हरवले मी स्वतःला 
एक प्रश्न विचारू का तुला?
ओळखलेस अचूक कसे तू मला?
उत्तरला तो मग त्यावरती 
अग तू तर माझी सखी सोबती 
पाहण्यासाठी मला तुजला 
आधार तो नयनांचा कशाला?
राणी हा प्रश्न मला नको विचारू
विचार तुझ्या श्वासांना का झाले ते फितूर ?
लाजेने घालून मग खाली मान
बसले होते मी विसरून भूक आणि तहान 
राणी, किती लपवशील अजुनी 
किती दूर जाशील माझ्यापासूनी?
आता तरी दुरावा सोड ना
एकदा फक्त काबुल कर ना
म्हण ना एकदा बघून माझ्या डोळ्यात
बसवले आहेस तू मला तुझ्या ह्रदयात
मी देणार त्याला प्रेमाची कबुली 
एवढ्यात अचानक जग मला आली 
मग चिडचिड करून स्वतःशी 
न्याहाळून मग मी बोलले प्रतिबिंबाशी 
खरच असा राजकुमार येईल का?
घेऊन त्याच्यासंगे दूरदेशी मला नेईल का?
- तेजश्री  

No comments:

Post a Comment