तारकेचे तन माझे चांदण्यांनी माखले
सागराचे मन माझे प्रेमासाठी तहानले
रातराणीचे नयन माझे काळोखात भिजले
काजव्याचे भान माझे प्रकाशात हरवले
मुंगीचे हे पाय माझे देशोदेशी भटकले
सोन्याचेहे हात माझे कारागीरीत बांधले
ठीगळाचे कातडे माझे कैक ठिकाणी उसवले
अजगराचे आतडे माझे पुन्हा पुन्हा पिरगळले
कमळाचे मत माझे खोलखोल बुडाले
लेखणीचे शब्द माझे तुझ्यापाशी अडकले
आयुष्याच्या सकाळी सकाळी मी मलाच हरवले
मी मलाच हरवले मी मलाच हरवले.......
तेजश्री
No comments:
Post a Comment