Wednesday, September 29, 2010

आकाशातल भांडण

आकाशात एकदा मोठ भांडण झाल 
ढगानी विजेच कंबरड मोडल 

वीज म खूपच भडकली 
सणसणीत ढगाच्या कानाखाली भडकावली 

आकाश बाबांनी म मध्यस्ती केली 
अंगाला हात न लावण्याची तंभी दिली 

जे काय बोलायचं ते तोंडानी 
बोलायचं नाही काही हातानी 

जर कोणी काही वेड वाकड वागाल 
तर मग आपल्या घराला मुकाल

मग दोघात झाला करार 
शाब्दिक "बाचा-बाची" न घेतला पुढाकार 

तू समजू नको स्वतःला कोणी फार महान 
माझ्या पुढे तु तर आहे खूपच लहान 

तुझ आयुष्य ते किती 
अन नखरे ते किती

तुला पाहून मोठे लहान सारेच घाबरतात 
तुझ्या फणकारण्याला भले भले दचकतात 

म्हणून अस नको समजू मी तुला घाबरीन
घाबरून तुझ्या हात पाया पडीन 

वीज ताई काय म गप्प बसणार होती 
वाटेल ते बोललेलं ऐकून ती घेणार नव्हती 

वीज ताई खेकसली म घुश्यात 
काळ ढूस थोबाड पहायलय का जरा आरश्यात 

एवढा अगडबंब तू, खा खा खातोस 
वाराकाकांचा ओरडा खाऊन म कसा मुळू मुळू रडतो 

माझ्याकडे बघ मी आहे किती सुंदर 
माझ नर्तन कौशल्य म्हणजे दुधात साखर 

तुझ्याकडे आहे का अशी काही कला
तू तर मुलखाचा रडका कुठला 

असुदेत असुदेत रडका असलो मी जरी 
आवडता आहे मी धरणीवरती 

माझ्या रडण्यातून पाऊस हा पडतो 
अख्या धरणीला सुजलाम सुफलाम करतो 

नाहीतर तू बघ स्वतःकडे, असून एवढी देखणी 
बालबच्याना तर वाटते तुझी भयंकर भीती 

तडा तडा नाचून काही कला नसते सादर होत 
तांडव नृत्य करून मन नसत जिंकता येत 

स्वतःकडे बघ आधी 
मग बोट उठव माझ्यावरती 

वीज आता शरमेने पंढरी फटक पडली 
ढग दादाची तिने माफीही मागितली 

माझ चुकल बाह्य रूपावर मी गेले 
अन तुझ्याशी विनाकारण भांडले 

ढगानेही म विजेला मैत्रीण मानल 
कधीच न भांडण्याच वचन दिल  

खरच मित्रहो असच असत ना आपलहि 
आपणही भुलतो बाह्य रुपावरती

ढगात आणि विजेत मग झाला एक तह 
राहायचं ठरवलं त्यानी एकमेकांसह 

आता ते गुण्या गोविंदाने राहतायत 
एकमेकांना ते समजून घेता आहेत 

जेव्हा तिराहीत कोणी त्यांच्या मध्ये येतो 
तेव्हा मात्र विजेच्या तोल जातो 

कडाडून ती साऱ्या विश्वावर ओरडते 
आमची मैत्री न तोडण्याच सुनावते 

आपलीही मैत्री अशीच असावी 
एकमेकांना समजून घेणारी 
अन एकमेकांची उणीदुणी न काढणारी 
आणि हो प्रेमाच्या पावसाने दुनियेला चिंब भिजवणारी 

- तेजश्री 

No comments:

Post a Comment