Wednesday, October 20, 2010

सहल

एक लांबसडक रस्ता वळणदार
दुतर्फा त्याच्या झाडे उभी दिमाखदार 

सोबतीला बेधुंद वारा गार गार 
अन आकाशात उधळलेले रंग हजार 

आदबीन झाडं या या म्हणतात 
मायेच्या छायेन निवांतपणा देतात 

झाडांच्या कुशीत तुम्ही आरामात पहुडता 
सगळे कष्ट अन ताप क्षणार्धात विसरता 

सोबत असलेल्या गारव्याला देत धन्यवाद 
विसरता तुम्ही सगळे तंटे अन वाद 

आकाशात उधळलेल्या रंगांच वाटते तुम्हाला कुतूहल 
निसर्गाच्या कुशीत निघून जाते सारी मरगळ

खळाळता आवाज ऐकून जाग तुम्हाला येते 
जवळच असणाऱ्या ओढ्याची जाणीव करून देते 

तुम्ही आपसूक ओढ्याकडे ओढले जाता 
गोड पाणी पिऊन तृप्त तुम्ही होता 

ओढ्याच्या किनारचा तो पिंपळ 
पाडतो तुम्हाला एकच भुरळ 

पिंपळावरचे ते सुंदर पक्षी गाणी गातात
तुम्हाला ते खूपच तल्लीन करतात

अशीही एक सहल जवळच्याच वनात
करून पहा एकदा तरी जीवनात 

- तेजश्री 

No comments:

Post a Comment