Wednesday, October 20, 2010

चंद्रमा

गवाक्षातून डोकावणारा गरगरीत गोल 
मुख लपवित वृक्षांच्या दाटीत खोल 
स्वछच नितळ प्रकाशाचा सडा
ओथंबून वाहणारा एक घडा 
सारून दूर असंख्य कवाडे 
म्हणे मला तो लाडे लाडे 
कवेत तुझ्या मला विसावू देत 
दृढ आलिंगनात मला हरवू देत 
अतृप्त मन माझे तृप्त झाले 
मार्गालीची कात टाकून चैतन्य आले 
मग शेवटच अवघ्राण घेऊन 
गेला तो दूर दूर निघून 
अचानक झाली जाणीव एकलेपणाची 
ओढ वेड्या मोह जालाची
योजने योजने दूर असून जाणवत नाही त्याच विरह 
कारण जवळ नसूनही तो आहे फक्त माझ्याच सह 

-तेजश्री    

No comments:

Post a Comment