स्त्री म्हणजे दुबळेपणा
स्त्री म्हणजे कमीपणा
स्त्री म्हणजे लाचारता
स्त्री म्हणजे असाह्यता
स्त्री म्हणजे अबला नारी
स्त्री म्हणजे ओल्या किनारी
स्त्री म्हणजे यातना
स्त्री म्हणजे करूणा
स्त्री म्हणजे नशिबाचा फास
स्त्री म्हणजे वियास
स्त्री म्हणजे लज्जा
स्त्री म्हणजे सजा
स्त्री म्हणजे चूल अन मुल
स्त्री म्हणजे दिशाभूल
अस ज्यांना वाटतंय
त्यांना निक्षून सांगायचं
तुम्ही अजून स्त्रीतल्या स्त्रीत्वाला ओळखलंच नाही
स्त्रीतल्या शक्तीला अनुभवलाच नाही
स्त्री म्हणजे माता
स्त्री म्हणजे निरागसता
स्त्री म्हणजे सौभाग्य
स्त्री म्हणजे सौख्य
स्त्री म्हणजे शक्ती
स्त्री म्हणजे भक्ती
स्त्री म्हणजे महासंग्राम
स्त्री म्हणजे सन्मान
स्त्री म्हणजे धरा
स्त्री म्हणजे मायेचा झरा
स्त्री पासूनच जग सुरु होणार
स्त्रीतच सार काही संपणार
अश्या स्त्रीला माझा सलाम!!!
- तेजश्री
No comments:
Post a Comment