लाल केशरी तबकाएवढ बिंब
पाहत होत सांजवेळी आपलच प्रतिबिंब
उधळून असंख्य रंग अवती भवती
आसमंतात पोहोचलेली त्याची ख्याती
लोभनीय ते दृश्य दृष्ट लागण्याजोग
सत्य परिस्थितीचा लागत नाही थांग
कोठून आल? कोठ चालल? प्रश्न पडती हजार
जलसमाधि घेताना करत असेल ते काय विचार
न थकता न भागात दिन दिनाचीही वारी
नव दिनाची नविन आशा घेऊन यायचं माघारी
हर दिनी एक अशी किती चित्र रेखाटली असतील
मज सारखे आणखीन किती जीव मोहरले असतील
उष्ण रंग वापरूनही चित्र किती ते सुंदर
विश्व्याच्या कलाकारापूढे अपोआप जुळती दोन्ही कर
- तेजश्री
No comments:
Post a Comment