Monday, November 29, 2010

सखा

थांग नाही तुझ्या मनाचा 
थांग नाही तुझ्या मताचा 

कधी प्रेमान जवळही करशील
दुसऱ्या क्षणी दूर लोटशील

तुझ्याबरोबर राहण्याचा आनंद तर आहे  
पण नंतर दूर जाण्याची भीतीच जास्त आहे 

तुझे नवे नवे गैरसमज
तुजपासून दूर लोटतात मज 

माझ्या पासूनच मीच दूर फेकली जाते 
भीतीच्या वावटळात गर गर फिरत राहते 

तुझ्या खांद्यावर विश्वासाने डोक ठेवावं 
अन कपाळमोक्ष होऊन वास्तवाच भान याव 

शारीरिक जखमा कालांतरान भरतीलही  
पण मनाला होणाऱ्या असंख्य कशा भरतील?

तुझ्यापासून दूर असताना जग हे मला खायला उठत
चहू बाजूनी उसणाऱ्या लाटांनी ते व्यापून टाकत 

रोज नव संकट रोज नव वादळ आयुष्यात उठत
दिवसाच्या शेवटी जीवनच नकोस होत 

अजून एक पाऊल अस म्हणत एक एक पाऊल जोडते आहे
तुझ्या बरोबर घालवलेल्या क्षणांना साद मी घालते आहे 

विश्वास वाटतो मला तो दिवस नक्की येईल 
जेव्हा मी तुझ्या अंतरंगाचाच एक भाग होईन 

तेजश्री 

No comments:

Post a Comment