Thursday, September 30, 2010

जगताना

फिरल्यास का कधी हिरव्यागार गवतात 
भिजलायस का कधी मनसोक्त पावसात 
बागडलायस का कधी फुलपाखराबरोबर 
दुलालायास का कधी झाडांबरोबर 
गायलायस का कधी पक्षांसंगे गाणी
वाहलायस का कधी होऊन झऱ्याच पाणी 
हसलायास का कधी खळाळून एकदा 
रडलायास का कधी लहान होऊन पुन्हांदा 
चुकलायस का कधी रोजच्याच प्रवासात 
हरवलायस का कधी कुणाच्या ह्रदयात 
जाणवलय का तुला नव्यान कधी काही 
झाली आहे का कधी शर्टाची ओली बाही 
ओळखलयस का तू तुझ्या सखीला 
बोललायस का कधी मनातले तू तिला 
नशील बोलला तर बोलून बघ 
तिच्यासंगे एकदा फिरून तर बघ
पावसामध्ये एकदा भिजून तरी बघ 
झाडांसंगे एकदा दुलून मग बघ 
पक्षांसंगे गाउन गोड गाणी  
होऊन झऱ्याच नितळ पाणी 
हास म तिच्याबरोबर खळाळून 
रड मग तिच्या कुशीत जाऊन 
एकदा तरी तिच्या मनात डोकावून बघ 
रोजच्याच प्रवासात एकदा तरी चुकून बघ 
नक्की सापडेल तुला नव्याने काही 
अपोआप मिळतील उत्तर सारी काही 

तेजश्री 

क्षण

क्षण आठवणीतले 
क्षण साठवणीतले
क्षण चिब पावसातले 
क्षण टपोऱ्या थेंबातले
क्षण गवताच्या पात्याचे
क्षण एकल्या फुलाचे 
क्षण उन्हातले 
क्षण चांदण्यातले 
क्षण थंडीतले 
क्षण मिठीतले 
क्षण त्याच्या बरोबरचे 
क्षण त्याच्या शिवायचे 
क्षण कधी सुखावणारे 
क्षण कधी रडवणारे
क्षण आपुलकीचे 
क्षण परकेपणाचे 
क्षण अपराधीपणाचे 
क्षण समाधानाचे 
क्षण बरसणारे
क्षण ते पाझरणारे 
क्षण ते हसवणारे 
क्षण गुदगुल्या करणारे 
क्षण लटके रुसणारे 
क्षण फुगून बसणारे 
क्षण समजावणारे 
क्षण हक्काने ओरडणारे 
आठवणीतले सारे क्षण साठवायचे आहेत मला 
तळहातावरच्या  फोडाप्रमाणे जायचे आहे त्याला  

तेजश्री 

प्रश्न

चार नाही चाळीस दिवस झाले तरी 
जेव्हा थेंबरही पाऊस पडत नाही 
तेव्हा शेतकऱ्याच्या जीवाचीच नाही फक्त 
तर सामन्यांचीही होते लाही लाही 
अश्रू डोळ्यातले लपवत लपवत 
देवाला दोष देताना 
आपली चूक नसल्याचा 
अविर्भाव आणताना 
खरच का चूक निसर्गाची 
का खरतर आधुनिकतेची 
प्रश्न पडती किती तरी 
रोजचीच कथा न्यारी 
भरभरून प्रगती करताना 
सहजतेने जग जिंकताना 
पुढची विण घालताना 
आपल्याच हाताने पुढले टाके बंद करताना 
क्षणभर तरी कधी विचार केला असेल 
काय उद्याच तर आपला शेवट नसेल 
आपल्याबरोबर करोडो माणसे मरतील
लाखो जीव नाहक बळी जातील 
जलचर वनचरच नाही तर उभायाचारही जग सोडतील 
ह्रास होईल साऱ्या सृष्टीचा 
ह्रास होईल ह्या बुद्धीचा 
माज करून ज्याच्या जोरावर  
अख्ख जग जिंकल होत 
तिलाही शेवटी झुकत माप घ्यावाच लागेल 
निसर्गापुढे आपल डोक ठेवावच लागेल 
अस सार असताना 
सार काही समजताना 
चार बुक शिकलेल्यांना 
आव्हान करते पुन्हांदा 
जागे व्हा आता तरी
सोडून द्या मनमानी 
वेळ वाया घालवू नका
प्रगती जरूर करा पण
निसर्ग नियमांना डावलू नका 
त्याला राग्येईल अस काही 
कधी कधी वागू नका 
जंगलतोड थांबवा 
प्लास्टिक वर बंदी घाला 
कायद्याची वाट न बघता
मनालाच थोडा आवर घाला 

तेजश्री 

ओढ

धरला आहेस आज हात तर पुन्हा तो सोडू नको 
पुन्हा मला वेडीला अंधारात धाडू नको 
तुझा तो उबदार स्पर्ष अनुभवू देत ना मला 
त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहूदेत ना मला 
आज नाही उद्या तरी तुला माझ प्रेम तुला कळेल
मग तरी तुझ मन माझ्याचकडे वळेल  
नसेन कदाचित मी कोणी परी किवा अप्सरा 
पण माझ्या प्रेमाचे वाजवू नको असे तीनतेरा 
कळेल जेव्हा तुला की केवळ तुझ्यासाठी भोगल्या मी यातना 
वळवू शकेन का मी तेव्हा तरी तुझ्या मना? 
होतास तू जेव्हा एकला
दोष देत नशिबाला 
विसरू नको त्या वेळेला 
शिकवले होते मी तुला भरारी घ्यायला 
मला कुठे माहिती होत तू एवढ मोठ उड्डाण घेशील 
आणि मग जीवनातल्या सखीला इतक सहज विसरशील 
प्रेम बीम झुठ असत अस तरी नको म्हणूस 
प्रेमाशिवाय जगणारा काय तो माणूस?
मी केवळ तुझ्यावर प्रेम आणि प्रेमच केल
काल केल आज करते आणि उद्याही करीन 
काहीहि झाल तरी तुझ्याशी एकनीष्ठ राहीन 
देऊन तरी बघ ना एकदा हात माझ्या हातात 
विश्वासाने बघ ना एकदा फक्त माझ्या डोळ्यात 
भ्याडासारखा काय डरतोस?
प्रेमाची कबुली द्यायला का घाबरतोस?
हातात हात घेऊन दे केवळ एकदा कबुली 
राहीन मी मग बनून तुझी सावली 
तू बासुरी तर सूर मी तयाचे
तबला तू जर बोल मी तयाचे 
कळणार कधी तुला हे मोल तुझ्या प्रियेचे 
तिच्या डोळ्यातल्या भावनांचे
भेटीच्या ओढ़ीचे 
अन स्पर्शाच्या आसुसतेचे 

तेजश्री 

लाट

निळ्याशार समुद्रात राहत होती एक लाट 
तिला तिच्या रूपाचा होता मोठा थाट माट

ऐकून एकेदिनी रुबाबदार किनाऱ्याची कथा 
ह्या छोटीला राहिली नव्हती स्वस्थता 

निघाली मग एकटीच शोधत रस्ता 
आणि खाल्ल्या वाटेत म खूप खस्ता 

अखेर बघून तो किनारा चमकदार 
निघाली ती आणखीनच दिमाखात 

मिळाली जेव्हा त्यांची नजरेला नजर 
किनार्याने पसरवले दोन्ही कर 

आपल्या भाळून रुपाला बोलावतो आहे हा आपल्याला 
असे वाटून मग ती जाऊन बिलगली त्याला 

रंगवली होती स्वप्ने तिने त्याच्या बरोबर बांधण्याच्या जन्मगाठी 
माहीतच नव्हते वेडीला काही नाती असतातच तुटण्यासाठी 

तेजश्री 

अबोला

तुझा अबोला मला आता सहन होत नाही
तुझ्या आठवनीन शिवाय एक दिवस जात नाही

इतरांनी तुला काही बोलल तर मला खपणार नाही
कुणाचीच अरेरावी मी ऐकून घेणार नाही

इतरंचा राग म नकळत तुझ्यावर निघतो
क्षणभरासाठी का होईना पण सयंम माझा ढळतो

तुला दुखवताना मी स्वतःलाच वेदना देत असते
स्वतःच्या हाताने स्वतःलाच जखमी करत असते

ह्या जखमा तर इतक्या खोल असतात
की कितीहि समजूत काढली तरी कधीच भरून येत नसतात

तुझ्या आठवणींवर जगताना ओल्या होतात डोळ्यांच्या किनारी
तुझ्या आठवणीत सरतात एका मागून एक रात्री

मी प्रेमाची कबुली देण्यासाठी अव्यक्तच राहीन कदाचित
ह्याचा अर्थ असा नाही की मी प्रेमच करत नाही

तुझ्या बद्दल वाटणारी तळमळ तितकीच उत्कट आहे
तुझ्यावरची प्रीत तेवढीच सच्ची आहे

मी काही न बोलता कळेल का तुला सगळ काही?
शब्दांची मदत न घेता उमगेल का तुला कधी काही

तुझ्याबद्दल मी पहिल्या पासूनच खूप Possesive आहे
आता आयुष्याच्या वळणावर मला तुझी साथ हवी आहे

सांग ना तू मला साथ देशील का?
ह्या वेडीला समजून घेशील का?

तेजश्री


Wednesday, September 29, 2010

लघुकथा

स्वप्नांच्या दुनियेतून आला एक कुमार
पांढऱ्या शुभ्र घोड्यावर होऊन स्वार 
हात घेऊन म माझा हाती 
घातली मग अंगुठी मधल्या बोटी 
म्हणला मग बसून दोन्ही गुडघ्यांवर 
खूपच फिदा आहे राणी मी तुझ्यावर 
मग मी ही ठरवलं मनाशी 
गंमतच करूयात ह्याच्याशी 
उठवून त्याला दोन्ही हातानी 
बांधली पट्टी दोन्ही नयनी 
फिरवले त्याला मग स्वतःभोवती 
शोधायला लावले मला मैत्रिणीनमधुनी  
अट अशी मी घातली होती 
पूर्ण करायला मिळेल एकमेव संधी 
स्पर्श करायचा नाही कुणालाच 
प्रश्न विचारायचा नाही कुठलाच 
मनात म्हटल मग आता 
निघून जाईल ह्याची हवा 
म्यानातली तलवार हातात घेऊन 
प्रत्येकीच्या गळ्याशी रुबाबात धरून 
घेतला होता अंदाज त्यानी 
एकेकीच्या निकटी जाउनी 
श्वासांच्या एकसंध लायीवरून 
ओळखले त्याने एकीला शपथेवरून 
विचारले जेव्हा मग मी त्याला 
करशील विवाह तिच्याशी, ओळखलेस तू जिला ? 
आत्मविश्वासाने हो जेव्हा तो म्हणाला 
त्याक्षणीच हरवले मी स्वतःला 
एक प्रश्न विचारू का तुला?
ओळखलेस अचूक कसे तू मला?
उत्तरला तो मग त्यावरती 
अग तू तर माझी सखी सोबती 
पाहण्यासाठी मला तुजला 
आधार तो नयनांचा कशाला?
राणी हा प्रश्न मला नको विचारू
विचार तुझ्या श्वासांना का झाले ते फितूर ?
लाजेने घालून मग खाली मान
बसले होते मी विसरून भूक आणि तहान 
राणी, किती लपवशील अजुनी 
किती दूर जाशील माझ्यापासूनी?
आता तरी दुरावा सोड ना
एकदा फक्त काबुल कर ना
म्हण ना एकदा बघून माझ्या डोळ्यात
बसवले आहेस तू मला तुझ्या ह्रदयात
मी देणार त्याला प्रेमाची कबुली 
एवढ्यात अचानक जग मला आली 
मग चिडचिड करून स्वतःशी 
न्याहाळून मग मी बोलले प्रतिबिंबाशी 
खरच असा राजकुमार येईल का?
घेऊन त्याच्यासंगे दूरदेशी मला नेईल का?
- तेजश्री  

कौलारू घर

एक कौलारू घर मस्त 
घरामागची पडवी प्रशस्त 
पलीकडे पोफळीची बाग खास
बागेत एक विहीर झकास 
तेथून जाणारी एक पाउलवाट 
नेऊन सोडते केवड्याच्या वनात 
वनाच्या पलीकडचा किनारा रुबाबदार 
त्याच्या पायाशी लोळणारा समुद्र निळाशार 
सागराचे वास्तव्य क्षितीजापर्यंत थेट 
तिथे त्याची होते आकाशाची भेट
आकाशात दरवळणारा लाल मातीचा सुवास
आहे की नाही आमच्या कोकणात बात काही खास!!!!
-तेजश्री  

आयुष्याच गणित

दिवसा ढवळ्या आकाशात काळे ढग दाटून आले 
त्याच्याशी मग जीवनाच गणित अपोआप जुळवले गेले 

काळे ढग डोळ्यांसमोर बेभान होऊन नाचत होते 
वाऱ्यासंगे  धुंदीत ते दंगा मस्ती करत होते 

इतक सगळ सहज घडल की प्रश्नाला जागाच नाही उरली 
पण नियतीच्या निकाल बघून अस्वस्थतेची ठिणगी पडली 

अख्खा दिवस समोर असताना दाटलेला हा काळोख 
आरशात पाहून स्वतःचीच पटणार नाही ओळख 

त्यातच मग एक गर्जना झाली 
दाटलेल्या ढगातून जोरात वीज कडाडली 

विजेची ती आरोळी ऐकली 
अन काळजाचा ठोका चुकवून गेली 

इतका भयाण दिवस एका माळरानावर एकटीने काढायचा तरी कसा?
ह्या दिवसाचा शेवट होईल कधी अन कसा?

किती ह्या इच्छा अन किती आकांक्षा 
किती जबाबदार्या  अन किती त्या अपेक्षा

फुल उमलायच्या आधीच कोमेजणार तर नाही 
अपेक्षांचं ओझ झेलताना नाव तर डुबणार नाही 

हे जीवन सुंदर आहे अस  ठासणाऱ्याना  प्रश्न नाही का पडत?
एवढ ओझ उचलताना कणा नाही का मोडत 

समाजाच्या बंधनापुढे किती वेळा झुकायच
इतरांसाठी आपण किती दिवस झीजायाच 

एक सकाळ तरी अशी येईल का?
सुखद धक्याने नाहून टाकेल का?

भयानक वातावरणातून कधी सुटका होणार 
समाजाची बेदी कधी हातातून निघणार 

नव्याने अपेक्षा करावीशी वाटते 
देवाकडे एकच प्रार्थना मी करते 
ह्या लोकांना थोडी बुद्धी तू दे 
संयमात राहूनही मुक्त ह्यांना होऊ दे 

- तेजश्री 

आकाशातल भांडण

आकाशात एकदा मोठ भांडण झाल 
ढगानी विजेच कंबरड मोडल 

वीज म खूपच भडकली 
सणसणीत ढगाच्या कानाखाली भडकावली 

आकाश बाबांनी म मध्यस्ती केली 
अंगाला हात न लावण्याची तंभी दिली 

जे काय बोलायचं ते तोंडानी 
बोलायचं नाही काही हातानी 

जर कोणी काही वेड वाकड वागाल 
तर मग आपल्या घराला मुकाल

मग दोघात झाला करार 
शाब्दिक "बाचा-बाची" न घेतला पुढाकार 

तू समजू नको स्वतःला कोणी फार महान 
माझ्या पुढे तु तर आहे खूपच लहान 

तुझ आयुष्य ते किती 
अन नखरे ते किती

तुला पाहून मोठे लहान सारेच घाबरतात 
तुझ्या फणकारण्याला भले भले दचकतात 

म्हणून अस नको समजू मी तुला घाबरीन
घाबरून तुझ्या हात पाया पडीन 

वीज ताई काय म गप्प बसणार होती 
वाटेल ते बोललेलं ऐकून ती घेणार नव्हती 

वीज ताई खेकसली म घुश्यात 
काळ ढूस थोबाड पहायलय का जरा आरश्यात 

एवढा अगडबंब तू, खा खा खातोस 
वाराकाकांचा ओरडा खाऊन म कसा मुळू मुळू रडतो 

माझ्याकडे बघ मी आहे किती सुंदर 
माझ नर्तन कौशल्य म्हणजे दुधात साखर 

तुझ्याकडे आहे का अशी काही कला
तू तर मुलखाचा रडका कुठला 

असुदेत असुदेत रडका असलो मी जरी 
आवडता आहे मी धरणीवरती 

माझ्या रडण्यातून पाऊस हा पडतो 
अख्या धरणीला सुजलाम सुफलाम करतो 

नाहीतर तू बघ स्वतःकडे, असून एवढी देखणी 
बालबच्याना तर वाटते तुझी भयंकर भीती 

तडा तडा नाचून काही कला नसते सादर होत 
तांडव नृत्य करून मन नसत जिंकता येत 

स्वतःकडे बघ आधी 
मग बोट उठव माझ्यावरती 

वीज आता शरमेने पंढरी फटक पडली 
ढग दादाची तिने माफीही मागितली 

माझ चुकल बाह्य रूपावर मी गेले 
अन तुझ्याशी विनाकारण भांडले 

ढगानेही म विजेला मैत्रीण मानल 
कधीच न भांडण्याच वचन दिल  

खरच मित्रहो असच असत ना आपलहि 
आपणही भुलतो बाह्य रुपावरती

ढगात आणि विजेत मग झाला एक तह 
राहायचं ठरवलं त्यानी एकमेकांसह 

आता ते गुण्या गोविंदाने राहतायत 
एकमेकांना ते समजून घेता आहेत 

जेव्हा तिराहीत कोणी त्यांच्या मध्ये येतो 
तेव्हा मात्र विजेच्या तोल जातो 

कडाडून ती साऱ्या विश्वावर ओरडते 
आमची मैत्री न तोडण्याच सुनावते 

आपलीही मैत्री अशीच असावी 
एकमेकांना समजून घेणारी 
अन एकमेकांची उणीदुणी न काढणारी 
आणि हो प्रेमाच्या पावसाने दुनियेला चिंब भिजवणारी 

- तेजश्री 

मी मलाच हरवले ...

तारकेचे तन माझे चांदण्यांनी माखले 
सागराचे मन माझे प्रेमासाठी तहानले 

रातराणीचे नयन माझे काळोखात भिजले
काजव्याचे भान माझे प्रकाशात हरवले 

मुंगीचे हे पाय माझे देशोदेशी भटकले 
सोन्याचेहे हात माझे कारागीरीत बांधले 

ठीगळाचे कातडे माझे कैक ठिकाणी उसवले 
अजगराचे आतडे माझे पुन्हा पुन्हा पिरगळले 

कमळाचे मत माझे खोलखोल बुडाले 
लेखणीचे शब्द माझे तुझ्यापाशी अडकले 

आयुष्याच्या सकाळी सकाळी मी मलाच हरवले 
मी मलाच हरवले मी मलाच हरवले.......

तेजश्री 

पाउस आठवणीतला.....

पाउस रिमझिमणारा 
पाउस बरसणारा 
पाउस कोसळणारा
पाउस चिंब करणारा
पाउस स्वतः भिजणारा 
पाउस तुलाही भिजवणारा 
पाउस म्हणजे श्रावणधारा
पाउस म्हणजे गार वारा
पाउस म्हणजे  चातक पक्षी
पाउस म्हणजे सुंदर नक्षी 
पाउस म्हणजे गडगडाट
पाउस म्हणजे थरथराट  
पाउस म्हणजे पाणी
पाउस म्हणजे  गाणी
पाउस म्हणजे गोड आठवणी 
पाउस म्हणजे  राजा अन राणी
पाउस म्हणजे प्रेम
पाउस म्हणजे फुटबोलचा  गेम 
पाउस म्हणजे धबधबा 
पाउस म्हणजे गरम चहा 
पाउस म्हणजे नवीन आशा
पाउस म्हणजे  नवदिषा  
पाउस म्हणजे एकच गोंधळ 
पाउस तरीही निरागस नितळ
पाउस म्हणजे सप्तरंगी अर्धगोल
पाउस म्हणजे पक्ष्यांचे मधुर बोल
पाउस  हे तांडव नृत्य 
पाउस  हे प्रायश्चित्त
पाउस कुणाचा?
पाउस हा नौजावानांचा 
पाउस तर किसानाचा 
पाउस तुझा
पाउस माझा 
पाउस हवाहवासा
पाउस मनाला दिलासा
पाउस पुन्हा पुन्हा येणारा 

तेजश्री 

अर्थ

गर्दीत असताना धरला होता त्यानी हात 
स्पर्शात होती त्याच्या काही वेगळीच बात
नाते ते हवेहवेसे
करून टाकी वेडेपिसे
गर्दीतही मग एकले करणारे
एकले असताना गर्दी करणारे
निशःब्द असे ते कानी रेंगाळणारे सूर
रखरखीत उन्हात चिंब भिजवणारे उर
तुझ्या नयनातून दिसणारे ते बिन शब्दाच काव्य
मुक्या जीवाच्या कंठातून फुटणार गीत छोटस पण श्राव्य 
शब्दाला शब्द जोडून काय कोणीही बोलू शकतो
पण स्पर्शातला अर्थ फक्त आपल्याच माणसाला कळतो........

तेजश्री