सुंदर साजिरी, गोड गोजिरी फुलचुखी ती खेळत होती
फुलाफुलांवर रम्य बागडत, मध चोखत ती फिरत होती
लाल निळे हिरवे पिवळे असंख्य ताटवे फुलांचे पसरले
इकडे धाऊ की तिकडे धाऊ मन वेडीचे गोंधळून गेले
रंग चकाकती रोज खुणावती अल्लड मन ते खेचून घेती
पराग कण जे वाहूननेण्या माध्यम तिचे ते करून घेती
वास दरवळे जिकडे तिकडे आकर्षण ते सदाच वाटे
ओढ त्या गंधाची इतुकी की आपोआप पाऊल अडते
भिरभिर भिंगरी पाया बांधली, अस्थिर मन अखंड फिरले
जीव इवला असूनदेखील पंख फडफडताना मन ना कचरले
उत्साही अशी फुलचुखी मनसोक्त जेव्हा खेळे
मन माझेदेखील लहानाहून लहान झाले
तेजश्री
No comments:
Post a Comment