नसता निकटी तू जेव्हा जीव हा हुरहुरतो
शब्द दाटुनी येती अन अर्थ वेगळा वाटतो
अश्रू डोळ्यात दोन ह्या हलकेच उमटती
तुझ्यावरल्या प्रितीची शाश्वती देऊनी जाती
विचार तुझेच सख्या रे श्वासाश्वासात अडकले
लावती जीवाला घोर मन वेडे का गुंतले
बचैन करते उत्कट ओढ तुझी ह्या मनी
नाजूक नात्याची जवळीक स्फुंदते नयनी
भास तुझा अन श्वास तुझा अखंड दरवळतो
नसता निकटी तू जेव्हा जीव हा हुरहुरतो !!!!!!
तेजश्री
No comments:
Post a Comment