मोहरून टाकत नाहीत मला मोहरा
भुलवत नाही कोणताच गोड चेहरा
हा पण ती आकाशावरची नक्षी
अन मुक्त विहरणारे कैक पक्षी
मनमुराद उधळलेले असंख्य रंग
पहिल्या पावसातला तो मृदगंध
पहाटेचा पक्ष्यांचा किलबिलाट
मनसोक्त खळखळणारी लाट
सांजवेळचा अस्ताला जाणारा भास्कर
पावसातल भूतलावर पसरलेलं हिरव अस्तर
डोंगरदऱ्यातून दुथडी भरून वाहणारी नदी
अन हिमालयावरची बर्फाची लादी
हिरवीगार शांत पसरलेली वनराई
सौंदर्यानी भरलेली वसुंधरामाई
अष्टमीची ती चंद्रकोर
थुई थुई नाचणारा मोर
ह्या सार्यांनी मात्र खूप खूप भुरळ घातली
एक अनामिक अशी ओढ लावली
- तेजश्री
No comments:
Post a Comment