Monday, December 13, 2010

हात तुझा हाती हवा

थंड थंड ही हवा 
बेधुंद हा गारवा 
ऋतू प्रीतीचा नवा 
हात तुझा हाती हवा 

गुलाबी गुलाबी पहाट
सौभाग्य शोभे मम ललाट
तुजसाठीचा शृंगार घाट
हात तुझा हाती हवा 

सांजवेळचा रम्य किनारा
बरसणाऱ्या श्रावणधारा 
बेभान वाहणारा वारा 
हात तुझा हाती हवा

रात्रीचे लुकलुक तारे 
निद्रिस्त जग हे सारे 
प्रीतीचे वाहती वारे
हात तुझा हाती हवा

तेजश्री 

No comments:

Post a Comment