मोहरून टाकत नाहीत मला मोहरा
भुलवत नाही कोणताच गोड चेहरा
हा पण ती आकाशावरची नक्षी
अन मुक्त विहरणारे कैक पक्षी
मनमुराद उधळलेले असंख्य रंग
पहिल्या पावसातला तो मृदगंध
पहाटेचा पक्ष्यांचा किलबिलाट
मनसोक्त खळखळणारी लाट
सांजवेळचा अस्ताला जाणारा भास्कर
पावसातल भूतलावर पसरलेलं हिरव अस्तर
डोंगरदऱ्यातून दुथडी भरून वाहणारी नदी
अन हिमालयावरची बर्फाची लादी
हिरवीगार शांत पसरलेली वनराई
सौंदर्यानी भरलेली वसुंधरामाई
अष्टमीची ती चंद्रकोर
थुई थुई नाचणारा मोर
ह्या सार्यांनी मात्र खूप खूप भुरळ घातली
एक अनामिक अशी ओढ लावली
- तेजश्री
Thursday, December 30, 2010
Wednesday, December 22, 2010
सुख की दुःख?
पक्ष्यांना स्वछंदी असण्याच
की बिनआखलेल्या रस्त्यावर आपली दिशा शोधत फिरण्याचा शाप मिळाल्याच
माणसांना बुद्धिमान असण्याच
की असलेली बुद्धी वापरात राहण्यासाठीच्या कष्टाचं
प्राण्यांना बोलता येत नसल्याच
की ह्या हत्यारी माणसाला कधीच जाणीव करून देऊ शकत नाही ह्या हतबलतेच
झाडांना स्वतःच अन्न स्वतः बनवता येत ह्याच
की आयुष्यभर एका जागी उभ राहण्याची शिक्षा मिळाल्याच
जीवाणुना लहान आणि साध असण्याच
की जन्मभर जगण्यासाठी झगडण्याच
आकाशाला असंख्य जीवांना छप्पर दिल्याच
की कायमच टांगत राहाण्याच
पृथ्वीला लाखो जीवांची आई होण्याच
की सतत भ्रमंती करत राहाण्याच
काय आहे ह्या साऱ्यांना सुख का दुःख ?
तेजश्री
Monday, December 13, 2010
दुःख
फुटावा काचेचा चषक खळSळ
हजार व्हावी त्याची शकलं
तसच काहीस झाल
अन सार आयुष्याच बदलल
नात आमच तुटू लागलं
मनाला वेदना देऊ लागलं
जखमांवर जखमा करू लागलं
असहाय्यतेच्या चक्रात फिरलं
एक वेळ अशी होती
झूट सारी नाती होती
एकमेकांशिवाय जगायची
कल्पनाच करवत नव्हती
तेव्हा क्षण युगासारखा वाटायचा
विरह अजिबात सहन नाही व्हायचा
आजही क्षण युग सारखा वाटतो
कारण क्षणोक्षणी दुःखाचा पूर येतो
कळून जेव्हा मला चुकले
ह्या जगात सारे एकले
जगायचे एकुले मारायचे एकुले
दोष देत आपलेच नशिबाले
भोग सारे भोगावेच लागणार
सार काही विसरावं लागणार
दुःखावर फुंकर घालावी लागणार
ताकही फुंकून प्यावं लागणार
तेजश्री
चेहरे
काही गर्दीतले चेहरे
लक्ष वेधून घेणारे
नजर खिळवून ठेवणारे
भान विसरवून टाकणारे
मनाला भुरळ पाडणारे
समोर नसताना आठवणारे
असताना सार विसरवणारे
स्व अस्तित्व दर्शवणारे
सोन्याहूनही चमकणारे
तरीही मातीत मिसळणारे
तेजश्री
हात तुझा हाती हवा
थंड थंड ही हवा
बेधुंद हा गारवा
ऋतू प्रीतीचा नवा
हात तुझा हाती हवा
गुलाबी गुलाबी पहाट
सौभाग्य शोभे मम ललाट
तुजसाठीचा शृंगार घाट
हात तुझा हाती हवा
सांजवेळचा रम्य किनारा
बरसणाऱ्या श्रावणधारा
बेभान वाहणारा वारा
हात तुझा हाती हवा
रात्रीचे लुकलुक तारे
निद्रिस्त जग हे सारे
प्रीतीचे वाहती वारे
हात तुझा हाती हवा
तेजश्री
Sunday, December 5, 2010
मैत्री
मैत्री म्हणजे सुंदर नात दोन जीवांना जोडणारं
मैत्री म्हणजे गोड गाण हृदयाची तार छेडणारं
मैत्री म्हणजे दवबिंदू गवततृणाला बिलगणारं
मैत्री म्हणजे चंद्रबिंदू काळोखात उजळवणारं
मैत्री म्हणजे रेशमी बंध घट्ट बांधुन ठेवणारं
मैत्री म्हणजे मृदगंध आसमंतात दरवळणारं
मैत्री म्हणजे सूर्यबिंब नवी उमेद देणारं
मैत्री म्हणजे टिंब वाक्याच्या शेवटी लागणारं
- तेजश्री
का?
ओळखीचे चेहरे एकदम अनोळखी का वाटतात ?
अनोळखी चेहरे अचानक ओळख का दाखवतात ?
विसरू पाहणाऱ्या गोष्टी नेमक्या का आठवतात ?
आठवणीत ठेवण्यासारख्या अचूक का विसरतात ?
कितीही ठरवूनही काही लोक टाळता का येत नाहीत ?
कितीही ठरवूनही टाळलेले लोक विसरता का येत नाहीत?
अनेकदा आपण मनाविरुद्ध का वागतो ?
प्रियव्यक्तींच्याच बाबतीत आपण कडवट का होतो?
कळत नकळत आपण दुखावले का जातो ?
आपण आपला राग प्रियजनांवरच का काढतो?
कितीही वाईट वागून जिवलग माफ का करतात ?
कितीही चांगल वागून शत्रू मात्र हेवा का करतात ?
जगाच्या भीतीने आपण मन का मारतो ?
मन मारताना आपलच सुख का हिरावतो ?
ह्या का ची उत्तर काळही का देत नाही ?
उत्तर मिळवण्यासाठी अख्खा जन्मही का पुरत नाही ?
- तेजश्री
Friday, December 3, 2010
आकाशातली होळी
कोणतीही असो वेळ
आकाशात रंगांचे खेळ
गुलाबी पहाटे उष्ण रंग उधळला
निळ्या पृष्ठभागावर लाल केशरी पिवळा
हळू हळू मध्यान झाली
वातावरणात उष्णता वाढली
आकाशातला गोल पिवळा
धगधगत्या आगीत तळपला
पांढरा काळा संगे निळ्या
ठसे सुचवती आकृत्या निराळ्या
झाली सांजवेळ जशी
जांभळाही साथीला येशी
मुक्त हस्ते उधलेले रंग
करून टाकती दंग
उपरवाला कोणी कलाकार आहे?
न जाणे कुणावर खुश आहे?
- तेजश्री
Subscribe to:
Comments (Atom)