शब्द लाजरे बुजरे आज जळात न्हाले
आठवणींनच्या पदराला नकळत ओले केले
आधार तुझा होता जेव्हा मला उमगले
नकळत उमलून कळीचे, टपोरे फुल झाले
शब्दांना सावरलेल्या त्या मायेच्या थापेचा
आवेग क्षणांना विश्वास दाखवलेला
कोठ्न आणलास 'शब्द' इतुका धैर्याचा
मला बापडीला का तोच तोकडा?
मोडून टाक ती रेष आखली तुझ्या माझ्याती
शब्दांना राहूदे अबोल सहवासा अंती
तेजश्री
११.०१.२०१३
छान !!
ReplyDeletedhanyawad
Delete