रात्रीच्या अंधाराची शाल
शालीवर चमचमणारे तारे
बघशील आणि चुकून प्रेमात पडशील...
शुभ्र गार गार जाई
त्यावर गंधाळणारे दवबिंदू
हुंगशील आणि चुकून प्रेमात पडशील ...
निवांत हलका वारा
आठवणींच मोरपीस
आठवशील आणि चुकून प्रेमात पडशील...
अथांग पसरलेला सागर
त्यातून उगवत केशरी बिंब
बघशील आणि चुकून प्रेमात पडशील..
लांबवर जाणारी ओली पाउलवाट
उघड्या माळरानावरचा चिंब पाऊस
भिजशील आणि चुकून प्रेमात पडशील...
दूरवरून ऐकू येणारा पावा
आणि मीरेची एकतारी
ऐकशील आणि चुकून प्रेमात पडशील...
येईल 'ती' समोर जुन्याच रुपात
नव्याने बघशील स्वतःच प्रतिबिंब
बघशील आणि चुकून प्रेमात पडशील....
तेजश्री
१९.०१.२०१३
No comments:
Post a Comment