पाउस पडत होता धुवाधार
वाऱ्यान थैमान घातलेल
छत्रीत सामावून घेशील वाटल
चुकलच जरा, तुला गृहीत धरल
दोष माझा नव्हता तुलाही माहिते
समजून घेशील वाटल, खुळ्यासारख
प्रेमान आपलस करशील वाटल
चुकलच जरा, तुला गृहीत धरल
तुझ्यासारखं नाही वागता येत
माहित आहे तुलाही
चुकताना सांभाळून घेशील वाटल
चुकलच जरा, तुला गृहीत धरल
काटा रुतला होता पायात
जखम सलत होती
हळूच काढशील वाटलेलं
चुकलच जरा, तुला गृहीत धरल
समोर काळोख दिसत होता
तू प्रकाश दिलास, ऋणी राहीन
शेवटपर्यंत दावशील तेज अस वाटलेलं
चुकलच जरा तुला गृहीत धरल
तेजश्री
२४.१२.२०१२
No comments:
Post a Comment