आज माझ्या अंगणी
पाऊस आला होता
तुझ्या नसण्याची
कमी पूर्ण करायला
पावसाची मिठी
तितकीच आश्वासक
अगदी तुझ्या मिठीची
आठवण करून द्यायला
घट्ट छातीपाशी धरत
त्यानी माझे ठोके ऐकले
अगदी हुबेहूब तसेच
जसे तुच ऐकायला
त्यानी स्वतःत सामावून
घेतले डोळा पाणी
स्व अस्तित्व लावले
संपूर्ण विसरायला
पाऊस माझ्या पदराशी
चाळे करत होता
अगदी तसाच जणू
तु लहानांगत खेळायला
पाउसातला पाऊस आज
राहिला नव्हता
जसा तु माझ्याहून
नाहीसच वेगळा
तेजश्री
०१.१०.२०११
No comments:
Post a Comment