अनाहूत शब्दाला कुठली किनार भावनेची
दाटलेल्या पाण्याला पकड काजळ रेषेची
कधी सहज शब्द बरेच काही बोलून जाती
बोचणाऱ्या अर्थाची त्यांना नसते भीती
अश्रूंनी काजळरेष तोडल्याची नाही तमा साधी
काळा डाग लागला तरी नाही वाटत अपराधी
वारंवार काढली खपली तर जखमा भळभळती
नकळतचे घाव ठेवी व्रण कायमचाच मनावरती
शब्द असे सामर्थ्य भात्यामधला अंतिम शर
घोट नरडीचा घेई सुटला इच्छा डावलून जर
जपून वापरावे असे हे शस्त्र खात्रीचे आहे जरी
दुःख देण्यास पुरे आहे काट्याएवढे लहानगे तरी
तेजश्री
३.१०.२०११
No comments:
Post a Comment