Wednesday, October 20, 2010

सूर्यास्त

लाल केशरी तबकाएवढ बिंब 
पाहत होत सांजवेळी आपलच प्रतिबिंब 
उधळून असंख्य रंग अवती भवती 
आसमंतात पोहोचलेली त्याची ख्याती 
लोभनीय ते दृश्य दृष्ट लागण्याजोग 
सत्य परिस्थितीचा लागत नाही थांग
कोठून आल? कोठ चालल? प्रश्न पडती हजार 
जलसमाधि घेताना करत असेल ते काय विचार
न थकता न भागात दिन दिनाचीही वारी 
नव दिनाची नविन आशा घेऊन यायचं माघारी 
हर दिनी एक अशी किती चित्र रेखाटली असतील 
मज सारखे आणखीन किती जीव मोहरले असतील 
उष्ण रंग वापरूनही चित्र किती ते सुंदर 
विश्व्याच्या कलाकारापूढे  अपोआप जुळती दोन्ही कर 

- तेजश्री 

चंद्रमा

गवाक्षातून डोकावणारा गरगरीत गोल 
मुख लपवित वृक्षांच्या दाटीत खोल 
स्वछच नितळ प्रकाशाचा सडा
ओथंबून वाहणारा एक घडा 
सारून दूर असंख्य कवाडे 
म्हणे मला तो लाडे लाडे 
कवेत तुझ्या मला विसावू देत 
दृढ आलिंगनात मला हरवू देत 
अतृप्त मन माझे तृप्त झाले 
मार्गालीची कात टाकून चैतन्य आले 
मग शेवटच अवघ्राण घेऊन 
गेला तो दूर दूर निघून 
अचानक झाली जाणीव एकलेपणाची 
ओढ वेड्या मोह जालाची
योजने योजने दूर असून जाणवत नाही त्याच विरह 
कारण जवळ नसूनही तो आहे फक्त माझ्याच सह 

-तेजश्री    

स्त्री

स्त्री म्हणजे दुबळेपणा 
स्त्री म्हणजे कमीपणा 
स्त्री म्हणजे  लाचारता 
स्त्री म्हणजे  असाह्यता 
स्त्री म्हणजे अबला नारी 
स्त्री म्हणजे ओल्या किनारी 
स्त्री म्हणजे यातना 
स्त्री म्हणजे करूणा
स्त्री म्हणजे नशिबाचा फास 
स्त्री म्हणजे वियास 
स्त्री म्हणजे लज्जा
स्त्री म्हणजे सजा 
स्त्री म्हणजे चूल अन मुल 
स्त्री म्हणजे दिशाभूल 
अस ज्यांना वाटतंय 
त्यांना निक्षून सांगायचं 
तुम्ही अजून स्त्रीतल्या स्त्रीत्वाला ओळखलंच नाही 
स्त्रीतल्या शक्तीला अनुभवलाच नाही 
स्त्री म्हणजे माता
स्त्री म्हणजे निरागसता 
स्त्री म्हणजे सौभाग्य 
स्त्री म्हणजे सौख्य 
स्त्री म्हणजे शक्ती 
स्त्री म्हणजे भक्ती 
स्त्री म्हणजे महासंग्राम 
स्त्री म्हणजे सन्मान 
स्त्री म्हणजे धरा
स्त्री म्हणजे मायेचा झरा 
स्त्री पासूनच जग सुरु होणार 
स्त्रीतच सार काही संपणार 
अश्या स्त्रीला माझा सलाम!!!

- तेजश्री 

सहल

एक लांबसडक रस्ता वळणदार
दुतर्फा त्याच्या झाडे उभी दिमाखदार 

सोबतीला बेधुंद वारा गार गार 
अन आकाशात उधळलेले रंग हजार 

आदबीन झाडं या या म्हणतात 
मायेच्या छायेन निवांतपणा देतात 

झाडांच्या कुशीत तुम्ही आरामात पहुडता 
सगळे कष्ट अन ताप क्षणार्धात विसरता 

सोबत असलेल्या गारव्याला देत धन्यवाद 
विसरता तुम्ही सगळे तंटे अन वाद 

आकाशात उधळलेल्या रंगांच वाटते तुम्हाला कुतूहल 
निसर्गाच्या कुशीत निघून जाते सारी मरगळ

खळाळता आवाज ऐकून जाग तुम्हाला येते 
जवळच असणाऱ्या ओढ्याची जाणीव करून देते 

तुम्ही आपसूक ओढ्याकडे ओढले जाता 
गोड पाणी पिऊन तृप्त तुम्ही होता 

ओढ्याच्या किनारचा तो पिंपळ 
पाडतो तुम्हाला एकच भुरळ 

पिंपळावरचे ते सुंदर पक्षी गाणी गातात
तुम्हाला ते खूपच तल्लीन करतात

अशीही एक सहल जवळच्याच वनात
करून पहा एकदा तरी जीवनात 

- तेजश्री