माझ्याविषयी तुझ्या अपेक्षा आहेत खुप
शब्द नाही तरी डोळे बोलून जातात गुपचूप
इच्छा तुझी अशी असंण नाही नवल मजला
सगळीकडे पुरे पडण कठीण आहे मला
अपूर पडायला परीस्थितीही कारणीभूत
विजोड भावनेचे कसे जोडावे सुत ?
निर्णय म घ्यावे लागतात प्रसंग पाहून
नाराज होऊ नको मत तुझ डावलल म्हणून
अस वाटतंय कि अचानक आभाळ भरून आलय
अपेक्षेच्या ओझ्याखाली हिरव अस्तर फाटलंय
आणि अचानक शब्द खुंटलेत, अर्थ सापडत नाहीयेत
माझ्या डोळ्यातले अपराधी भाव तुला उमगत नाहीयेत
तेजश्री
१९.१०.२०१२
No comments:
Post a Comment