तुझ्या माझ्यात आपण एक रेषा आखली तर
परिस्थितीने ती उल्लंघाया भाग पाडले तर ?
पाळताना बंधने, बंध मी तुला नाही घालणार
मात्र चंद्राने चांदणीला नजरकैद केले तर?
मी तुला माझा हो अस कधी नाही म्हणणार
समोर तू आल्यावर भाव नेत्रातून झरले तर ?
नाही कळून देणार नाते अपुल्या मधले
मात्र निकटी तू येता नजर फितूर झाली तर
व्यथा, संकटांची चिखल फेक चालूच असणार
त्यातही सुखाची निल कमले फुलली तर?
तेजश्री
१९.११.२०१२
No comments:
Post a Comment