अथांग पसरलेला समुद्र
क्षितिजापर्यंत दूरदूर
त्याच्या कुशीत विसावला
समुद्राच्या लाटा आदळल्या
क्रोर्यपणे फेसाळल्या
आपटल्या खडकावर
पण तो अचल स्थिर
नाही हलला ध्येयापासून
झाल्या जखमा लाटेतून
जसा लाटांचा जोर वाढला
त्या आणखी भळभळल्या
खाऱ्या पाण्यानी डसल
खडकाला देखील रडवलं
हेतू नव्हता बिचार्याचा
खडकाला दुखवायचा
तो तर आधार होता
सीमा घालणारा होता
त्याच्याविना सागर
गेला असता वाहवत
भला मोठा असूनही
नमत होता खडकापाशी
एकमेव होता दैवस्थान
अख्या जगासमोर नाहीपण
त्याच्या पुढ नमाव वाटायच
त्याच्याविना, पान नाही हलायचं
कशी काढणार समजूत
विचार झाला पाठवावा दूत
भेडसावणारी शंका दूर व्हावी
प्रेमाची नाती तशीच टिकावी
तेजश्री
०९.१०.२०१२

No comments:
Post a Comment