विचारांचा हलकल्लोळ माजलेला, एका मागून एक येणारे न थांबणारे विचार. हे का येतात? कुठून येतात? आणि मग क्षणभर थांबून कुठे जातात? विचारात मी कुठे रमते? सुप्तमनातले हे विचार कधी बोचरे तर कधी सुखद असतात, एका मागून एक विचार पुन्हा पहिलाच विचार....विचारांचं एक आवर्तन पूर्ण होत खर पण पूर्णत्वाला जातात का हे विचार? त्यातून अपेक्षित उत्तर मिळते का? ह्याच विचारांवरची एक कविता...
क्षणोक्षण काढतात विचार हे शतकी धावा
कुठून येती कोठे जाती क्षणचा नाही उसावा
कुणा अन का छळावे नसते त्यांना परवा
विचार वेडे भूतकाळाचे आठवणींचा गोड विसावा
विचार चालू वर्तमानाचे अनुभवाचा उत्तम ठेवा
विचार न जन्मल्या दिनाचे कुतूहल ते खुळ्या जिवा
विचार स्थळ वा प्रिय व्यक्तीचे हास्याचा वदनी फुलवा
विचार अप्रिय प्रसंगाचे दाटून येतो मनी रुसवा
विचार अखंड जरी चालले मेंदूला तो अद्भुत मेवा
विचार भीती नैराश्याचे आणती मनी दुःखाचा फुगवा
विचार इच्छित घटनेचे मोहरून टाकतो जणू गारवा
विचार माफी मागण्याचा, रुखरुखतेचा मनी छळवा
विचारांचे अखंड मंथन पूर्ण करती एक गोलावा
होऊन जरी तो एक फेरा जाती का ते पुर्णत्वा
विचार होती प्रगल्भ तेव्हाच होतो त्यांचा देवा घेवा
तेजश्री
No comments:
Post a Comment