अवघड आहे माझी भूमिका समजण
क्लिष्ट कधी किचकटही कळण
पण जेव्हा तुझा अविश्वास आणि आटलेल प्रेम
मी नजरेत वाचते तेव्हा हलून जायला होत
एखाद्या प्रसंगात माझी भूमिका तुला पटणारही नाही
राग चिडचिडहि वाटेल
पण मलाही बाजू असू शकते
एवढ किमान मनाच्या कोपऱ्यात राहू दे
आता ह्या पलीकडे जाऊन मी काय सांगू?
कसली स्पष्टता देऊ?
पण थोड मलाही समजून घेशील
तर तुझ्या-माझ्या नात्याला ते हितकारक होईल!
तेजश्री
१६.०७.२०१४
No comments:
Post a Comment