Monday, June 30, 2014

विषय

आज काय गप्पांचे विषय संपलेत?
तुला सगळच कंटाळवाण का वाटतंय?
नवीन पुस्तक नको… 
एखादा लेख नको  
नव्यान चर्चा नको
दिलखुलास टाळी  नको
संगीतातली हरकत 
आवडता चित्रपट 
काहीच कस नकोय तुला ?
कधी हरवलेलं प्रेम 
नाहीतर जिंकलेला गेम 
किंवा 'त्यांचं' लफड 
एखादा हटके प्रसंग 
काहीही नकोय तुला ?
विसरभोळेपणाचा किस्सा 
नाहीतर जमिनीतला हिस्सा 
सरकार, पाणी, महागाई 
पगाराची घाई 
बिलाची पावती 
कराची चुकती  
बँकेच काम
उधार दाम 
काही काही बोलायचंच नाहीये तुला?
निसर्ग पाऊस कविता 
सांजेचा सविता 
भविष्याची आखणी 
अचूक संधीची हेरणी 
व्यायामाची कसरत 
फिटनेसच डायट 
काहीतरी असेल न ? 
विषय संपलेत का ?
अस कस होऊ शकत ?

तेजश्री 
१.०७.१४

No comments:

Post a Comment