शुभ्र टपोऱ्या चांदण्याचा ध्यास
संगे विरघळलेला जाईचा श्वास
धुंद बेधुंद गार गार वारा
नयनी वसल्या प्रेमधारा
एक फुललेल झाड फांद्या गुंफलेल
चांदण खात स्तब्ध थांबलेल
चांदण्यात रमताना वेळ सरूच नये
गुंफलेल्या फांद्या कधी सुटूच नये
तेजश्री
२७.०४.२०१३
No comments:
Post a Comment