मला कळतात
तुझे अबोल शब्दार्थ
मला कळतात
तुझ्या भावना अव्यक्त
मला जाणवते
उब तुझ्या हातातली
मला जाणवतात
स्वप्ने तुझ्या नेत्रातली
मला आवडतो
गंध सहवासानंतर दरवळणारा
मला आवडतो
भाव तुझ्या हृदयातला
मला भावते
मूर्ती तुझी पाषाणाची
मला भावते
गोडी तुझी अमृताची
तेजश्री
१२.०३.१३
No comments:
Post a Comment