पुलावर बसले होते राजा आणि राणी
पुलाखालून वाहून गेले बरेचसे पाणी
आता मात्र नदी झाली होती शांत
पाचोळा गेला वाहून जीवन विश्रांत
भाव झरले नेत्रातून अनेकदा ह्या आधी
आज मात्र सारे बोले हस्तमिठी साधी
झाड उभ होत पोक्त हात नम्र जोडून
सुचवत होत पुढली वाट एकमेकांना सोडून
राजा तो होता श्रीमंत आटपाट नगराचा
पण तरी होणार नव्हता कधी त्या राणीचा
आजची भेट वाटलेलं, चित्र करेल भंग
रास रंगात भिजलेले जागवेल प्रसंग
घडवायचे नियतीला मात्र उलटे होते
बंधनातही प्रेम जगवायचे होते
निखळ प्रेमाच उमटलं बिंब जळात
सृष्टी नाहिली राजा-राणीच्या प्रेमात
तेजश्री
०१.०२.२०१३
No comments:
Post a Comment