Wednesday, February 8, 2012

गुंता



असं नाहीये मला शब्द सापडत नाहीयेत 
मला परिचयाचे आहेत ते 
मी सगळ स्वच्छ बोलू  शकेनही 
हळव्या भावना सुंदर उलगडेनही 
पण मला तसं  करायचंच नाही 
सार्या गोष्टींना शब्दबद्ध करायचं नाही
कारण बंधन बांधून फक्त व्रण उठतात 
अपेक्षा पूर्ण करण्याच्या दडपणाचे 
बुद्धी गहाण ठेऊन निर्णय घ्यायचाच नाहीये  
भावनांची कदर असावी अशी किमान अपेक्षा 
पुन्हा अपेक्षा, पाठोपाठच दडपण 
नकोच ना ते 'नाते'...न उलगडणार  
काही गोष्टी सहजरित्या समजाव्यात 
भावनिक गुंता हलक्या हाताने सोडवावा 
टोक अधिक ताणल्याने गुंता वाढणार आहे  
मात्र माझ्यापेक्षा कुणीतरी पुढाकाराने तो सोडवावा 
'गरज' वगेरे बोलण्याची ताकद नाहीये 
अर्थ पण तात्कालिक वाटतो 
जीवनातल समाधान मावेल त्यात? 
नाही इतका मोठा तर नक्कीच नाही 
म्हणून जास्त गुंता वाढलाय 
विचारांचा, भावनांचा, अपेक्षांचा ........


तेजश्री
०८.०२.२०१२ 

4 comments:

  1. तेजू छान आहे मुख्तछंदातली हि कविता.भावनांचा गुंता,विचारांचा गुंता ....न उलगडणारे नाते....शब्दात सुंदर मांडलेस.

    ReplyDelete