असं नाहीये मला शब्द सापडत नाहीयेत
मला परिचयाचे आहेत ते
मी सगळ स्वच्छ बोलू शकेनही
हळव्या भावना सुंदर उलगडेनही
पण मला तसं करायचंच नाही
सार्या गोष्टींना शब्दबद्ध करायचं नाही
कारण बंधन बांधून फक्त व्रण उठतात
अपेक्षा पूर्ण करण्याच्या दडपणाचे
बुद्धी गहाण ठेऊन निर्णय घ्यायचाच नाहीये
भावनांची कदर असावी अशी किमान अपेक्षा
पुन्हा अपेक्षा, पाठोपाठच दडपण
नकोच ना ते 'नाते'...न उलगडणार
काही गोष्टी सहजरित्या समजाव्यात
भावनिक गुंता हलक्या हाताने सोडवावा
टोक अधिक ताणल्याने गुंता वाढणार आहे
मात्र माझ्यापेक्षा कुणीतरी पुढाकाराने तो सोडवावा
'गरज' वगेरे बोलण्याची ताकद नाहीये
अर्थ पण तात्कालिक वाटतो
जीवनातल समाधान मावेल त्यात?
नाही इतका मोठा तर नक्कीच नाही
म्हणून जास्त गुंता वाढलाय
विचारांचा, भावनांचा, अपेक्षांचा ........
तेजश्री
०८.०२.२०१२
Wah, sundar jamliye kavita
ReplyDeletedhanyawad
Deleteतेजू छान आहे मुख्तछंदातली हि कविता.भावनांचा गुंता,विचारांचा गुंता ....न उलगडणारे नाते....शब्दात सुंदर मांडलेस.
ReplyDeletedhanyawad
Delete