रोज रातीला निखळ
चंद्र येतो जातो
आठवणींचे नव वादळ
तेवढ सोडून जातो
रोज पहाटे तरंग
अचल पाण्यावर उमटतात
ते प्रत्येक प्रसंग
फेर धरत अंगावर येतात
रोज दिवसा आभाळ
काळी शाल पांघरून येत
आठवणी भूतकाळ
होण्याची भीती दाटवून जात
तेजश्री
११.१२.२०११
No comments:
Post a Comment