झाडात झंकारली पाखराची धुन
निळे कपाशी मेघ झाले आज उन उन
ढगापाठी पाऊसही लपला उन होवून
गुलाबी थंडीत स्पर्श तुझा उन उन
स्पर्षातला कापरा भाव आलारे कोठून?
डोळे अन्यथा जिवंत, जाहले आज शुष्क उन
वेचले दृष्टीआडचे अश्रु, न पाझरले नयनातून
नको सख्यारे विचार आणूस का पावसानंतर येई उन?
नविन दिशा सापडत असते तुटलेल्याच स्वप्नातून........
तेजश्री
१३.११.२०११

No comments:
Post a Comment