प्राजक्ताचा सडा आज अंगणी सजला
केशरी रंगाने श्वेत वर्ण तो खुलला
पावसाचा सडा आज अंगणी भिजला
थेंबात मिसळत मृदगंध दरवळला
चिंचपानाचा सडा आज अंगणी पडला
नाजूक पानांची नक्षी रेखाटून राहिला
चांदव्याचा सडा आज अंगणी पडला
निशब्द रातीला हसवून तो गेला
तेजश्री
२९.०८.२०११
chhan kavita ahe :)
ReplyDeleteDhanyawad
ReplyDelete