दूरपर्यंत पसरलेलं पोरक माळरान
तोडीस तोड काळमिट्ट आभाळ
क्षितिजस्पर्षाची स्पर्धा दोघात
कोण कुणावर करणार मात
कधी वाटे रान पुढे पळते
कधी आभाळ पुढे भासते
आभाळाचे दिशादर्शक तारे
रानाला मिणमिणते काजवे
अजून निकाल लागला नाही
ह्या चढाओढीला शेवटच नाही?
काही चढाओढी असतात नाही का हो अश्या
जिंकण्यापेक्षाही पळण्यातला आनंदासाठीच खेळलेल्या .........
तेजश्री
१३.०५.२०११
No comments:
Post a Comment