रंग लावला श्रीहरीने, राधिकेस आज
रोमांच अंगी, उमटली गालावरती लाज
नटखट कान्हा राधेसंगे खेळतो रासगाणी
बावरी करी सुटकेसाठी लटकी विनवणी
धरला हात केवळ मी, बोलला श्रीरंग
लावून घे सखे तु , माझ्या प्रेमाचा रंग
प्रित बोल बोलली, हरीची बासरी
हरखून गेली क्षणात, राधाही बावरी
भिजला हरी अन भिजली गवळण
अवघा रंग एक बोले कृष्ण कृष्ण कृष्ण
तेजश्री