गुंतत चालल्यात फांद्या एकमेकात
स्पष्ट दिसतंय धागे जुळता आहेत
रंग मिसळता आहेत एकमेकात
अस्तित्व विसरलेत एकेमेकांच
नविन छटा तयार झाल्यात
एक सुंदर सलग्न कापड विणलंय
उब आहे त्यात प्रेमाची, मायेची
स्वप्ने आहेत त्यात उज्वल उद्याची
आकांक्षांच आभाळ अथांग पसरलय
आणि सोबतीला तुझा विश्वास आहे
तुझ्या हातातला आत्मविश्वास आहे
तुझ्या हृदयातली उर्मी आहे
अगदी सुर्यालाही लाजवेल अशी
नव क्षितीज आपल्याला बोलावतय
ते तिथे पलिकडे …दुरवर
पण तुझ्यासाथीत सहज पार होईल
अखेर सरिता मिळेल सागराला ….
आनंद साजरा होईल तेव्हा गगनात ….
फुल फुलतील चहूकडे
आणि पक्षी गातील मंजुळ गाणी
सार सार प्रसन्न होईल सहप्रवासात ….
तेजश्री
०३.०१ .२०१३
No comments:
Post a Comment