आठवण काढणार वासरू
घरी अडकलय
दुधाची भूक सहन करत
'गायी' लक्षात असु दे !
काळ्यामिट्ट काळोखात
चांदणी कुडकुडतीये
तुझी वाट पाहत
'चंद्रा' लक्षात असु दे !
सरिता ठेचकाळत
मैलोनमैल पायपीट करत
तुझ्या मिलनासाठी येतीये
'सागरा' लक्षात असु दे !
उंच उंच झेप घे
पण घरट्यात कुणीतरी
तुझी वाट बघतय
'पाखरा' लक्षात असु दे !
वाट बघणार
आठवण काढणार
अपेक्षा ठेवणार
वेड्या आशेच
कुणीतरी आहे
एवढ तरी लक्षात असु दे !
तेजश्री
१६.०१.२०१४