आक्रंदली 'ती'
नुरे सुखाश्रू
आघात बसे वर्मा
दूरवर पसरली
एकच दुखाःची लकेर
अटून जल गेले
सारे पोटातले अखेर
छिन विच्छिन्न पडलेली
तिची काळीभोर काया
पावसाने लावले
तिला कैक दिस तरसाया
रुसली 'ती' की
रुसला पाउस न कळे
नाळ जोडली पावसाशी
ठरवूनही न तुटे
उपजला त्यातूनच
दुष्काळ तान्हुला
कलेकलेने मोठ्ठा
होतच राहीला
वरून सूर्याची
न झेपणारी टीकास्त्रे
घायाळ करी तिला
तीव्र उन्हाचे चटके
आक्रोशली 'ती'
झेलल्या वेदना
पोहचल्या पावसाशी
तरी न फुटे पान्हा
तेजश्री
१९.०२.२०१३
१९.०२.२०१३