झंकारली श्रावण धुन
पावसासंगे सोनेरी उन
टप टप थेंब पानावरती
साचले जणू शुभ्र मोती
ढग खेळती लपाछपी
धावत कैक अंतर कापी
सरी खेळती पाठशिवणी
पक्षी गाती गोड गाणी
मृद्गगंधाची खुले कुपी
सृष्टी भासे अप्सारारूपी
इंद्रधनुचा मुगुट डोई
हिरवीगार झाली भुई
भिजरी पायवाट नागमोडी
सरसर जात जंगल तोडी
श्रावण तर ऋतूंचा राजा
श्रावणासंगे लुटू मजा
तेजश्री
२७.०६.२०१२
सुंदर कविता...:)
ReplyDeleteधन्यवाद ताई
ReplyDelete