ओळख? खूपच चांगली होती
स्वतःहूनही आधी एकमेकांची
खरतर फार दिवसांची नव्हती
पण साताजन्मांच्या बंधनाची
ओढ त्यात दडली होती
नव्याने भेट झाली एकमेकांची
आत्मा जुना तरी शरीरे नविन होती
प्रकृती तीच पण स्वभाव भिन्न होते
ओढ तशीच पण प्रसंग वेगळे होते
स्वाद होता, लज्जत होती, नजाकत होती
गम्मत होती, परीक्षा होती, भीतीही होती
विश्वास होता, पण मानवी बंधन होती
अंतिम ध्येय ठाऊक होत
पण पाऊल वाटेत नाविन्य होत
आजूबाजूला मोहक स्थळ होती
आकर्षक अशी नाती होती
आणि, नेमक नको तेच झालं
एका सुंदरीची भुरळ त्याला पडली
'त्या' सुंदरीची त्यानी ओळख करून दिली
चूरचुरल तिला, खुपलं, घायाळ झालं मन
उदास झालं,कळेचना कस सामोर जाव
दुखः वाटलं, आपल प्रेम कळलंच नाही ह्याला?
किती सहज भुलला तो दिखाऊ देखाव्याला
म काहीबाही आठवू लागल बिचारीला
आपल असेल तर येईल आपल्या जवळ
खंबीर झाली म, अश्रु दडवून टाकले सहजतेने
हास्याची लकेर ओढून घेतली चेहऱ्यावर
स्वागत केल नविन नात्याचं, दोघातल्या तिसर्याच
दिवस उडत होते, भिरभिरत खुप दूर गेले
त्या 'सुंदरी' मध्ये जन्माच मावलं नाही समाधान
जाणीव झाली सत्याची त्याला पूर्णपणे
पण आज खुप उशीर झाला होता स्वतः ला ओळखायला
तरी धीर केला त्याने आपलस केल तिला
आणि तिच्या कडे पाहताना त्याला स्वतःचच दिसलं प्रतिबिंब
नव्याने झाली ओळख स्वतःची, नविन उमलत्या नात्याची .........
तेजश्री
१७.०२.२०१२
सहजतेने एक अतिशय कठीण विषय ह्या कवितेतून मांडला आहेस ग....सुंदर लिहिले आहेस!कमीतकमी शब्दात खूप काही....नेमके...छान आहे कविता.
ReplyDeletethanks monika tai
ReplyDelete