काळ सावळ आकाश भवताली पसरलेलं
नुकतच चिंब पाऊसात न्हाहून निघालेलं
गोमट्या चान्दव्याचा प्रकाश विखुरलेला
सागरलाटेला चुंबण्यास अधिरलेला
झुळूक आता वाऱ्याच्या मिठीत विसावली
निश्चल राती अलगत गंधाची कुपी उघडली
ऋतू जुनाच असून नव्याने सापडला
पाऊस आला, अन हरवला सूर देऊन गेला
तेजश्री
No comments:
Post a Comment