तुजविन काय सांगू
किंमत आयुष्याची
तुजविन जीवन जणू
मूर्ती पाषाणाची
शब्द असून जिथे
कमी आहे अर्थाची
रेष बदलून मुखावरली
उणीव जिथे भावाची
पाकळ्या असून एका देठी
पूर्णता नाही जिथे फुलाची
जरी कस्तुरी असून उदरी
कमीच जिथे गंधाची
तुजविन श्वास आहे
कमी मात्र प्राणाची
कल्पनाच करवत नाही
तुजविन जगण्याची
तेजश्री