आयुष्याच्या वळणा वळणावर भेटतात नाती अनेक
सुख दुःखाची चाहूल घेत टिकतात मोजकीच नेक
एक हात सोडून दुसरा हात आपण धरतो खरा
नव्या हातातला विश्वास मात्र अनुभवावा कसा बरा
एकदाचा अनुभव पुन्हांदा येईलच असं नक्कीच नसत
तोंड भाजल की मात्र ताक फुंकरून पिण्यात काय वावग असत
पण काही नाती अशीही असतात
निस्वार्थी, प्रेमळ हवीहवीशी वाटतात
अनपेक्षितही नसताना जिव्हाळा देतात
आवश्यकतेपेक्षा जास्त माया लावतात
अचानक लांबची नाती खुप जवळची होतात
चार भेटीतच जन्मोन जन्माची ओळख दाखवतात
जन्मभराची नाती मात्र क्षणार्धात तुटतात
एका शब्दाने किती परकेपणा आणतात
प्रेम, जिव्हाळा, माया पावलो पावली लाभते
ते जाणवण्यासाठी मात्र नजर नितळ साफ लागते
आजपर्यंत खुप प्रेमळ माणस भेटली
वेगवेगळ्या नात्याने सामोरी आली
खुप मिळाला जिव्हाळा, खुप लाभली माया
ऋणी राहीन मी कायमच लाभूदेत अशीच प्रेमछाया
तेजश्री