हळव्या कळीचे शब्द भासे दलाला पोरके
शब्दात दडला अर्थ काही न केल्या उमगे
कोवळ्या पानाला आज कैक अठ्यांनी घेरले
अजाणत्या वयात का हे पोक्त पण लाभले
रातीचा चंद्र तरुण, निश्चल अबोल भ्रमला
ध्येयशून्य भ्रमंतीत सारे जीवन का बुडाला
वृद्ध आकाश अचल उबेची शाल गुरफटले
लाभलीच नाही त्यास कितीही मनी चिंतले
शब्द आणि अर्थ म्हणजे दोन किनारे लांब ते
वाटे जेथे भेटतील अचूक, नेमके तेथेच दुरावते
तेजश्री
No comments:
Post a Comment