Wednesday, May 12, 2021

माझं नवं प्रेम

 

आज काल मी तुझ्याकडे बघत बसतो एकटक
डोळ्यांची पापणीही न हलवता बिनदिक्कत

तू ठीक नऊला येणार माहीत असतं मला
घट्ट खुर्चीत बसून घेतो फक्त तुला पहायला

दहा मिनिट आधीच चहा नाश्ता उरकतो
अस वाटत कधी एकदा खिडकीतून पाहतो

तुझ्यावर खर्चायला खिशातले पैसे चाचपडतो 
मोबाईलचे notification मी बंद करतो

काय तुझे नखरे आणि काय तुझी अदा 
जेव्हा पासून कळलीस मी तुझ्यावर फिदा

तुझे हिरवे डोळे बघायला मी झालो बेभान  
तू माझी लैल्ला आणि केवढा ग तुझा मान 

कधी कधी किती छान जमत नाही आपलं ? 
माझ्या मोजलेल्या किमतीचं तुझ रोख उत्तर
झटपट मिळतो मोबदला अन 
मिळतो निस्सीम आनंद 
हृदयात उमटतात कल्पनेचे तरंग 

अस वाटत आता तू फुलशील
खूप उंच भरारी घेशील 
माझ्या ' तूट ' पुंजीला 
गगनात घेऊन जाशील 
कल्पना येते इमले बांधायची 
मुलांचे हट्ट पुरवून बायकोला साडी आणायची 
एखादी बियर ही रीचवयाची ठरवतो 
तुझ्या आलेखाबरोबर मीही हवेत तरंगतो 
खिसा हळू हळू फुगत असतो 
आणि अचानक कोण जाणे तुला येतो राग 
धाडकन घालतेस पेकाटात लाथ 
हिरवे डोळे लाल होतात 
माझे खिसे फाटके होतात 
मुलांची चिवचिव गोंगाट वाटते 
बायकोची हाक पारा माझा चढवते 
साऱ्यावर निघतो तुझ्यामुळे राग
कारण तुला पडताना बघायचा मी केलाच नसतो विचार 

बायको मग सखी बनते 
मलाच काही समजावते
आकर्षण आणि प्रेमातला फरक कर म्हणते 
वाचायला लावते तुझ्यावरली बुके 
गिरव म्हणते सारे सारे धडे 
खाच खळगे समजून घे आणि मग मार उडी 
बायकोचं म्हणातिये खर प्रेम चाचपड आधी 

आता मी ठरवलंय तुझ्या नखर्याला नाही भुलयाच 
डोळे उघडे ठेवून निर्णय घ्यायचा 
प्लॅन A  बरोबर प्लॅन B आधीच ठरवून घ्यायचा 😂

(स्टॉक मार्केट वर आधारित )
तेजश्री

Friday, March 6, 2015

राधा कृष्ण


रंग लावला श्रीहरीने, राधिकेस आज
रोमांच अंगी, उमटली गालावरती लाज
नटखट कान्हा राधेसंगे खेळतो रासगाणी
बावरी करी सुटकेसाठी लटकी विनवणी
धरला हात केवळ मी, बोलला श्रीरंग
लावून घे सखे तु , माझ्या प्रेमाचा रंग
प्रित बोल बोलली, हरीची बासरी
हरखून गेली क्षणात, राधाही बावरी
भिजला हरी अन भिजली गवळण
अवघा रंग एक बोले कृष्ण  कृष्ण कृष्ण
तेजश्री

Tuesday, March 3, 2015

वेळ नाही

वेळ नाही
पैसे कमवले रग्गड
पण खर्चायला वेळ नाही
whats app skype वर लांबच गप्पा  प्रत्यक्ष भेटायला मात्र वेळ नाही
पोट पहिले नियम अजाणता
जाणुन भुक तरीही जेवायला वेळ नाही
भाव डोळ्यातून वाहून गेले
पुसायलाही वेळ नाही
धडपडले रक्ताळले पडले
तरीही उठण्यासही वेळ नाही
शब्द उतरवायला देखील
आज वेळ नाही आज वेळ नाही आज वेळ नाही.....

Thursday, January 8, 2015

चांदणे


तुझी प्रीत मजवर 
जणू मंद दुग्ध चांदणे 
थंड शीत समीराची 
भावनिक आंदोलने 
लाभला सूर त्यास 
झाले 'जीवन' गाणे 
सुगंध दरवळला  
रातराणी फुलल्याने 
साथ तुझी अतूट 
मोहमयी जाणीवेने 
स्पंदने उमटली 
हृदयातील ममतेने 
मंजुळ पावा नादला  
ऐकला गगनाने  
घेतली शपथ आज 
रवि-शशी साक्षीने 
रंगून जाईल प्रवास 
सुरेल संगीताने  

तेजश्री 
०९.०१.२०१५ 

Friday, July 18, 2014

भूमिका


अवघड आहे माझी भूमिका समजण 
क्लिष्ट कधी किचकटही कळण  
पण जेव्हा तुझा अविश्वास आणि आटलेल प्रेम 
मी नजरेत वाचते तेव्हा हलून जायला होत 
एखाद्या प्रसंगात माझी भूमिका तुला पटणारही नाही 
राग चिडचिडहि वाटेल 
पण मलाही बाजू असू शकते 
एवढ किमान मनाच्या कोपऱ्यात राहू दे 
आता ह्या पलीकडे जाऊन मी काय सांगू?
कसली स्पष्टता देऊ?
पण थोड मलाही समजून घेशील 
तर तुझ्या-माझ्या नात्याला ते हितकारक  होईल!

तेजश्री 
१६.०७.२०१४

Monday, June 30, 2014

विषय

आज काय गप्पांचे विषय संपलेत?
तुला सगळच कंटाळवाण का वाटतंय?
नवीन पुस्तक नको… 
एखादा लेख नको  
नव्यान चर्चा नको
दिलखुलास टाळी  नको
संगीतातली हरकत 
आवडता चित्रपट 
काहीच कस नकोय तुला ?
कधी हरवलेलं प्रेम 
नाहीतर जिंकलेला गेम 
किंवा 'त्यांचं' लफड 
एखादा हटके प्रसंग 
काहीही नकोय तुला ?
विसरभोळेपणाचा किस्सा 
नाहीतर जमिनीतला हिस्सा 
सरकार, पाणी, महागाई 
पगाराची घाई 
बिलाची पावती 
कराची चुकती  
बँकेच काम
उधार दाम 
काही काही बोलायचंच नाहीये तुला?
निसर्ग पाऊस कविता 
सांजेचा सविता 
भविष्याची आखणी 
अचूक संधीची हेरणी 
व्यायामाची कसरत 
फिटनेसच डायट 
काहीतरी असेल न ? 
विषय संपलेत का ?
अस कस होऊ शकत ?

तेजश्री 
१.०७.१४

Wednesday, March 19, 2014

तरी


पावला पावलावर खुणा तुझ्या 
मागे वळून बघितलं तरी 
नाही बघितलं तरी

कानात घुमणारी हाक तुझी
'आज' मारलीस तरी 
नाही मारलीस तरी 

प्रेमात चिंब भिजणारी मी 
तू जवळ घेतलेस तरी 
नाही घेतलेस तरी 

तरंगणारी होडी मी 
तू तारलेस तरी
नाही तारलेस तरी 

माझा नाहीस तू 
कस म्हणू? 
अस म्हंटल तरी 
नाही म्हंटल तरी 

तेजश्री 
२०.०३.२०१४