पावला पावलावर खुणा तुझ्या
मागे वळून बघितलं तरी
नाही बघितलं तरी
कानात घुमणारी हाक तुझी
'आज' मारलीस तरी
नाही मारलीस तरी
प्रेमात चिंब भिजणारी मी
तू जवळ घेतलेस तरी
नाही घेतलेस तरी
तरंगणारी होडी मी
तू तारलेस तरी
नाही तारलेस तरी
माझा नाहीस तू
कस म्हणू?
अस म्हंटल तरी
नाही म्हंटल तरी
तेजश्री
२०.०३.२०१४