झेपावला जरीही
पंख फाटलेले
जपली अस्मिता तरी
आभाळ उसवलेले
दिशा शोधत गेला
परी रस्ता हरवलेले
डोळ्यातल्या स्वप्नात
मार्ग चुकलेले
दाटले बळ पायात
तरी बेडीत अडकलेले
जागृत आकांक्षांचे
ध्येयज्योत विझलेले
तेजश्री
२७.१२.२०१३